माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची सरकारकडे ‘ ही ‘ मागणी

नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेती नापीक झालेली असून शेतकऱ्यांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट एकरी 10 हजार रुपयांचे अनुदान द्यावे यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत निवेदन दिलेले आहे.

शिवाजीराव कर्डिले यावेळी म्हणाले की, ‘ महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिरायती भागाला सहा हजार रुपये आणि बागायत भागाला 13 हजार रुपये अनुदान मिळत होते मात्र सध्याच्या काळात हेक्‍टरी 13 हजार रुपये आणि बागायतसाठी सत्तावीस हजार रुपये देण्याचा अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे मात्र आमची मागणी सरसकट एकरी दहा हजार रुपयांची आहे . कपाशी बाजरी सोयाबीन तूर पालेभाज्या फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यात नुकसान झालेले आहे त्यामुळे दिवाळी गोड करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ हे अनुदान मंजूर करण्यात यावे आणि त्यांच्या खात्यात पैसे दिवाळीपूर्वी जमा करावेत अशी मागणी केली आहे .