नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून ‘ राकेश ओला ‘ यांची नियुक्ती

शेअर करा

नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले मनोज पाटील यांची बदली झालेली असून त्यांच्या जागी नवे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची आता नगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

राकेश ओला हे 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सरळ सेवा भरतीने सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. 2014 मध्ये त्यांची श्रीरामपूर येथे नियुक्ती असताना त्या वेळी त्यांनी केलेल्या अनेक कारवाया अद्यापही चर्चेत आहेत त्यानंतर त्यांची मालेगावला अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बदली झालेली होती. जातीय दंगलीची पार्श्‍वभूमी असणाऱ्या मालेगाव येथील त्यांची कारकीर्द ही नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली त्यानंतर ते सध्या नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी रात्री झालेल्या आदेशानंतर त्यांना अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आलेले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे अहमदनगर येथे एक ऑक्टोबर 2020 मध्ये रुजू झालेले होते. त्यांचा कार्यकाळ अद्यापही पूर्ण झालेला नसून एक वर्ष बाकी असतानाच त्यांची बदली करण्यात आल्यामुळे त्यांच्या बदली पाठीमागे राज्यात झालेला सत्ताबदल देखील कारणीभूत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे. राज्यातील तब्बल 19 अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू झालेले असून या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे मात्र इतरत्र त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही.


शेअर करा