रोहित पवारांच्या ‘ त्या ‘ आरोपावर विखे पाटलांनी ठणकावले

शेअर करा

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी फोडण्याचा आरोप हा रोहित पवार यांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला आहे असे म्हटले आहे.

रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर आता भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे असे वक्तव्य केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘ रोहित पवार यांचे हे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठी केलेले आहे. त्यांचे घर फोडायला कुणाला वेळ नाही. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे जे काही नुकसान झालेले आहे ते आता आम्हाला भरून काढायचे आहे. आम्हाला राज्याची घडी पुन्हा बसवायचे आहे त्यामुळे कोणाचे घर फोडायला आम्हाला वेळ नाही ‘ असे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजपवर जोरदार टीका करताना ‘ देशभरात जेवढे प्रादेशिक पक्ष आहे ते सगळे पक्ष आणि त्यांचे अस्तित्व भाजपला संपवायचे आहे मात्र राष्ट्रवादी संपवण्यासाठी भाजपला पुन्हा दहा जन्म घ्यावे लागतील तरीदेखील राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही ‘ असे म्हटले आहे.


शेअर करा