आणखी कोणत्या तज्ञांचा अहवाल तुम्हाला पाहिजे ?, प्राजक्त तनपुरेंचा हल्लाबोल

शेअर करा

नगर जिल्ह्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातलेला असून हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झालेली आहेत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पिक विमा कंपन्या फसवणूक करीत आहेत अशा शब्दात प्राजक्त तनपुरे यांनी विमा कंपन्यांना ठणकावले असून कंपन्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाही तर केवळ नफा कमावण्याचे काम करत आहेत. झालेल्या नुकसानीची 80 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरपाई विमा म्हणून न मिळाल्यास विमा कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल ‘ असे म्हटले आहे

21 तारखेला राहुरी इथे आयोजित करण्यात आलेल्या एका शेतकरी बैठकीत ते बोलत होते. राहुरीच्या कृषी कार्यालयात शेतकरी, अधिकारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांची त्यांनी एकत्रित बैठक घेतली त्यावेळी पिक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत सुधारणा झाली नाही तर संबंधित कंपन्यांचे संचालक आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही असे देखील त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीने कपाशी, सोयाबीन, सर्वच खरीप पिके आणि फळबागांचे झालेले नुकसान उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत असताना आणखी कोणत्या तज्ञांचा अहवाल तुम्हाला पाहिजे ? असे देखील त्यांनी यावेळी या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ठणकावले. राहुरी मतदार संघात विकास कामे ठप्प पडली असून राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर निधी अडविण्यात आलेला आहे याच्या निषेधार्थ म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी सायकल रॅली देखील काढली होती त्यालादेखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.


शेअर करा