अद्यापही ‘ त्या ‘ तरुणाचा तपास नाही ,नगरमध्ये गुरुवारी घडली होती दुर्घटना

शेअर करा

नगर शहरातील जोरदार पावसामुळे नगर कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पुलावर पाणी वाहत असताना वाहत्या पाण्यातून एका व्यक्तीने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला होता मात्र दुर्दैवाने तो त्यात वाहून गेला. 20 तारखेला संध्याकाळी ही घटना घडली होती मात्र अद्यापही या तरुणाला शोधण्यात यश आले नसून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विशाल बंडू देवतरसे असे या तरुणाचे नाव असून नगर शहर आणि परिसरात मुसळधार पावसामुळे सीना नदीला गुरुवारी पूर आलेला होता. नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानंतर वाहत्या पाण्यातून न जाण्यासाठी या तरुणाला अनेक जणांनी हाका मारल्या होत्या मात्र त्याने कोणाचे ऐकले नाही आणि हा पूल तो क्रॉस करण्याच्या प्रयत्नात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. त्याने पोहण्याचा देखील प्रयत्न केला मात्र पाण्याला मोठा वेग असल्याने तो पाण्यासोबत लोटला गेला होता. पोलीस यंत्रणा, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचा शोध घेत असून अद्यापपर्यंत त्याला शोधण्यात यश आले नाही.


शेअर करा