‘ ती ‘ चार मुलांची आई अन ‘ तो ‘ २२ वर्षाचा मात्र पुढे असे काही घडले की ?

  • by

चार मुलांची आई असून देखील तिला शेजारी काम करणाऱ्या एका २२ वर्षीय मुलाबद्दल आकर्षण तयार झाले. त्यांच्यात प्रेमप्रकरण देखील सुरु झाले मात्र शेवटी त्याने तिचा खून केला. विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असून सौरभ असे आरोपीचे नाव असून त्याने हसीन नामक प्रेयसीची त्याने हत्या केली. विशेष म्हणजे सौरभ याचे वय 22 वर्षे असून हसीन हिला चार मुले आहेत.

उपलब्ध वृत्तानुसार, सौरभ हा एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. हसीन आपल्या पतीसोबत दुकानाच्या शेजारी राहत होती. त्याच दरम्यान हसीन आणि सौरभ हे एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याच अवैध संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर दोघंही एकमेकांना चोरून भेटायला लागले. सुमारे दीड वर्षे हा प्रकार सुरु होता.

काही दिवसांपूर्वी सौरभ आणि हसीन शेतात भेटत असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं आणि गावात चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे हसीनच्या पतीनं तिच घराबाहेर पडणंही बंद केलं मात्र तरीही हसीन लपून छपून घराबाहेर पडत सौरभला भेटत होती. गावात प्रकरण वाढू नये म्हणून सौरभने तिला नकार दिला मात्र सौरभने भेटण्यासाठी नकार दिल्यानंतर तिने आजवरचे आपल्या दोघांत झालेले सर्व काही उघड करेल अन तुला अडचणीत आणेल, असे सांगून त्याला ब्लॅकमेल करायला लागली. सततच्या ब्लॅकमेलिंगला वैतागून अखेर सौरभनं हसीनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

सौरभने हसीनला शेतात भेटण्यासाठी बोलावले मात्र त्याने तिला संपवायचा निर्णय मनाशी पक्का केलेला होता. त्यासाठी एक मोठा सुरा घेऊन तो शेतात पोहचला. त्याला भेटण्यासाठी आतुर झालेली हसीन तिथे त्याची वाट पाहत होती. तिच्याबरोबर बोलण्याच्या नादात अचानक त्याने हसीनच्या गळ्यावरून सुरा फिरवला आणि ती रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच सौरभ पोलीस स्टेशनला निघून गेला.

शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आणि दुसरीकडे रक्तानं माखलेला सुरा घेऊन आरोपी सौरभ थेट पोलीस ठाण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. आरोपीला पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं असून संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरु केली आहे.घटनास्थळी जाऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.