बहिणीला व्हिडीओ कॉल करून घेतली पुलावरून उडी , पोलीस पोहचले अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नवी मुंबई येथे समोर आली असून चेंबूर येथे राहत असलेल्या एका तेहतीस वर्षीय तरुणाने आपल्या बहिणीला आणि मेव्हण्याला लाईव्ह व्हिडिओ कॉल करत वाशी खाडी पुलावरुन उडी टाकून आत्महत्या केलेली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून प्रशांत वाईकर असे तरुणाचे नाव असल्याचे समजते. वाशी पोलिसांनी तात्काळ खाडीत जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही त्यानंतर त्यांनी बेपत्ता म्हणून नोंद केली आणि तपास सुरू असतानाच त्याचा मृतदेह आढळून आला.

उपलब्ध माहितीनुसार, प्रशांत वाईकर हा चेंबूर येथील जिजामाता नगर येथे त्याच्या पत्नीसोबत राहत होता तसेच वाहन चालक म्हणून तो काम देखील करायचा . प्रशांत राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर त्याची बहीण आणि मेहुणे यांचे गारमेंट्सचे दुकान असून तिथे प्रशांतची पत्नी ही देखील काम करत होती . प्रशांत त्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झालेले असून त्याला मूलबाळ झालेले नाही तसेच आर्थिक परिस्थितीमुळे तो नैराश्यात गेलेला होता .

रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरून तो वाशी येथील खाडी पुलावर आला आणि त्यानंतर त्याने बहिणीला आणि मेव्हण्याला व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करत आहोत असे सांगितले. बहिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फोन कट केला आणि मेव्हण्याला कॉल करून आपण आत्महत्या करत आहोत असे सांगितले आणि मोबाईल फोनसहीत खाडी पुलावरुन उडी घेतली घेतली.

प्रशांतच्या नातेवाईकांनी कंट्रोल रूमला फोन करून सांगितले आणि त्यानंतर पोलिस पथक सक्रिय झाले. वाशी पोलिसांनी अग्निशामक दलासह खाडी पुलावर धाव घेतली मात्र तो आढळून आला नाही. मच्छीमारांच्या बोटीने संध्याकाळपर्यंत त्याचा शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही अखेर पोलिसांनी शोधकार्य थांबवले आणि पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद केलेली आहे.


शेअर करा