लग्नात ‘ इतकी ‘ मोठी फसवणूक , पतीच्या प्रियकराचा होता प्लॅन

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच लग्नाची एक विचित्र घटना समोर आलेली असून चारचौघांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले होते. नातेवाईकांच्या समोर गळ्यात हार घालून हे लग्न पार पडले मात्र लग्नानंतर दहा महिन्याच्या आत पत्नीला पतीचे जे गुपित कळले ते ऐकून तिला एकच हादरा बसला. तिच्या पतीने तिची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती त्यामुळे अखेर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले.

उपलब्ध माहितीनुसार, एका डेटिंग ॲपवर दोघांची ओळख झाली होती. तिचा होणारा नवरा हा पुरुषांप्रमाणेच वावरत होता आणि एक सर्जन असलेल्या व्यक्तीसोबत आपला बिजनेस आहे असे तिला सांगत होता. आपण सध्या धर्म परिवर्तन केले असून जोडीदाराच्या शोधात आहोत असे सांगत त्याने या तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते त्यानंतर पुढे जाऊन दोघांचे लग्न देखील झाले. सर्जन मित्र हा

मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या जावईबापूवर संशय आला होता कारण तो सतत त्यांच्या मुलीकडे पैसे मागायचा तसेच व्यवसायाच्या इतर गोष्टी देखील तो सतत लपवत होता. मुलीच्या माहेरच्यांना संशय आल्याचे पाहून हा पती त्याच्या पत्नीला घेऊन एका भाड्याच्या घरात राहायला गेला त्यावेळी त्याने पत्नीला डांबून ठेवले तसेच तिला इतर कुणाशी बोलू दिले नाही. मुलीचा होणारा छळ पाहून तिच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले आणि त्याला ताब्यात घेतले त्यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यावेळी त्याने केलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

धक्कादायक बाब म्हणजे महिला ज्याला पुरुष आणि पती समजत होती तीच चक्क महिला असल्याचे आढळून आले. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केले आन आपण लग्न केले तो पुरुष नव्हे तर स्त्री आहे आणि केवळ आपल्यापासून पैसे काढण्याच्या उद्देशाने त्याने आपल्या सोबत लग्न केले असे या या प्रकरणात समोर आल्यानंतर तरुणीला जबरदस्त हादरा बसलेला आहे. पुरुषाच्या वेषात वावरणाऱ्या या महिलेने चक्क धोका देऊन तिच्यासोबत लग्न केले आणि तिची आर्थिक फसवणूक देखील केली. पीडित महिलेने कोर्टात धाव घेतली आहे. सर्जन मित्र हा पुरुष असून या महिलेचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते अन केवळ पैशासाठी तिने हा प्रकार केला. झी 24तासने या संदर्भातील वृत्त दिले आहे.


शेअर करा