सतत मुलीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी शिकवला धडा , अपहरण केले अन ..

शेअर करा

अनेक प्रकरणात आपल्या मुलीची छेड काढल्यानंतर मुलीचे पालक हे पोलिसात जाणे टाळतात त्यातून आपली बदनामी होईल तसेच आरोपी मुलगा पाळत ठेवून आपल्याला किंवा मुलीला पुन्हा त्रास देईल अशी त्यांना भीती असते मात्र कल्याण येथे एक वेगळेच प्रकरण समोर आले असून एका मुलीची छेड काढल्यानंतर मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाचे अपहरण केले आणि त्याला बेदम चोप दिला. कल्याण पश्चिम येथे ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी ही कल्याण परिसरात राहत असून परिसरातील नुपूर चव्हाण नावाचा तरुण तिची सातत्याने छेड काढत होता. सदर मुलगी 12 वर्षांची असून मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाची माहिती समजताच आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले आणि कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकातून नुपूर याचे अपहरण केले त्यानंतर एपीएमसी ग्राउंड इथे त्याला घेऊन गेले आणि त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी काढणाऱ्या नुपूर चव्हाण याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तर त्याचे अपहरण करून त्याला बेदम चोप दिल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह इतर तीन जणांवर देखील गुन्हा दाखल करत त्यांना देखील अटक केली आहे.


शेअर करा