सुधरा..गुगलला आठवड्यात पुन्हा दुसऱ्यांदा 936 कोटी रुपयांचा दंड

शेअर करा

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलला भारतीय प्रतिस्पर्धा आयोग यांनी पुन्हा एकदा 936 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून गुगल प्ले स्टोअरच्या धोरणाबाबत अयोग्य पद्धतीने व्यापार करण्यात आला असे आयोगाचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसातील ही दुसरी कारवाई असून याआधी देखील सुमारे तेराशे 37 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला होता.

इंटरनेट सर्च इंजिन तसेच अँड्रॉइड फोन यामध्ये मक्तेदारी असलेल्या गुगलने आपल्या अधिकाराचा वापर करत प्रतिस्पर्ध्यांना जाणीवपूर्वक पाठीमागे ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आपल्या चुकीच्या व्यावसायिक कृती तात्काळ थांबवण्याचे निर्देश आयोगाने दिलेले असून एका ठराविक कालमर्यादेत आपल्या आचरणात बदल करण्याचे सांगण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअर हे इंटरनेट ॲप विकसित करून मार्केटिंग करण्याचे एक माध्यम आहे. ऐप बनवणाऱ्या व्यक्तींना बिलिंग पेमेंटसाठी ठराविक एकच सेवा वापरण्याची सक्ती करणे योग्य नाही असे देखील आयोगाने म्हटले आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

गुगल अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेकदा गुगलशी संबंधित असलेल्या सेवा जसे जीमेल, गुगल मॅप, गुगल पे व इतरही अनेक ॲप ग्राहकाच्या माथी विनाकारण मारली जातात त्यासाठी अनइंस्टाल पर्याय देखील उपलब्ध करून दिला जात नाही. गूगलशी स्पर्धा करणारे इतर इन्स्टॉल केले तरीदेखील ती व्यवस्थित चालू दिली जात नाही आणि गुगलच्या प्रोडक्टचाच वापर करण्यासाठी पूर्ण मोबाईल सिस्टीम कार्यरत आहे. गुगलच्या जाहिरात क्षेत्रातील इतर स्पर्धकांना देखील जाणीवपूर्वक या क्षेत्रात इंट्री देखील मिळू दिली जात नाही त्यामुळे आयोगाने गुगलला आपल्या वर्तणुकीत बदल करण्याचा इशारा दिलेला आहे.


शेअर करा