नगर ब्रेकिंग..महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार

शेअर करा

महाराष्ट्रात ग्रामीण भागात वीज वसुलीला असंख्य अडचणी येत असून वीज कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली जात आहे. सदर घटना ही निंदनीय असून असाच एक प्रकार नगर तालुक्यातील भोरवाडी शिवारात सत्तावीस तारखेला घडलेला आहे. महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दीपक रंगनाथ भोर, संतोष बबन भोर आणि देवराम तुळशीराम माने ( तिघेही राहणार भोरवाडी ) अशी आरोपींची नावे असून सारोळा कासारचे शिक्षणाचे कनिष्ठ अभियंता असलेले दीपक बराट हे भोरवाडी गावाच्या शिवारात तात्पुरते बसवलेले रोहित्र बदलून बदलण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपींनी त्यांना मज्जाव केला आणि त्यातून वादावादी झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली.

तक्रारदार बराट यांचा मोबाईल आरोपींनी हिसकावून घेऊन फोडला त्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह तिथे धाव घेतली आणि आरोपी दीपक भोर आणि देवराम माने यांना अटक केली तर तिसरा आरोपी संतोष भोर हा अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती आलेला नाही. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.


शेअर करा