शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा.. ? , सात शेळ्या दगावल्या

नगर महापालिकेचा अनागोंदी कारभार नागरिकांना चांगलाच परिचयाचा आहे. शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागलेली असून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव देखील शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मार्केट यार्ड सारसनगर परिसर येथे देखील मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात फिरत असून दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री दहा ते पंधरा कुत्र्यांनी गवळीवाडा येथील कैलास निस्ताने यांच्या गोठ्यावर हल्ला करून सात शेळ्यांवर हल्ला केला त्यावेळेस शेळ्यांचा मृत्यू झालेला आहे. ऐन दिवाळीत कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसलेला असून त्यांनी महापालिकेच्या कार्यक्षमतेवर संताप व्यक्त केलेला आहे.

नगर शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी काही व्यक्ती प्राणीप्रेमी म्हणून मोकाट कुत्र्यांना खाऊ घालतात मात्र त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेकदा ही कुत्री झुंडीने नागरिकांवर देखील हल्ला करतात. शहरातील आधी एका लहान मुलाचा मृत्यू देखील झालेला आहे त्यानंतर कारवाई करण्यात येईल असे उत्तर दिल्यानंतर आंदोलन देखील थांबतात आणि ही प्रकरणे पुन्हा मागे पडतात. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत.

नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनीदेखील महापालिकेच्या या कार्यशैलीवर संताप व्यक्त करत कुत्र्याकडे महापालिकेने अक्षरश : दुर्लक्ष केलेले आहे. रात्री-अपरात्री नागरिकांना शहरांमध्ये एकट्याने फिरणे देखील शक्य होत नाही. महापालिकेने मोकाट कुत्र्यांवर कुठलीही उपाययोजना केली नाही म्ह्णून मग कैलास निस्ताने यांनी महापालिकेने पीडित परिवाराला मदत करावी आणि शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील ठणकावले आहे.