असे कुठे असते का ? आमदार राम शिंदेचा हल्लाबोल

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जामखेडमध्ये दाखल होऊन एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती असा आपला संघर्ष गेल्या तीस वर्षांपासून मी करत आहे . धनशक्तीला वाटते की महाराष्ट्र विकत घेऊन तो खंडाने देऊन अमेरिकेत जगायला जाऊ असे म्हणत रोहित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे एका कार्यक्रमानिमित्त तानाजी सावंत आले होते त्यावेळी ते म्हणाले की, ‘ आपल्याला सर्वसामान्य माणसांसाठी काम करायचे आहे. आमचे आणि आमदार राम शिंदे यांचे विचार सारखेच आहेत. धनशक्तीच्या विरोधात मी एकटा तीस वर्षे लढत होतो आता अशीच माणसे माझ्यासोबत आहेत. राम शिंदे हे माझे मित्र आहेत त्यांनी विनंती नाही आदेश केला तरी या मतदारसंघात येईल. 2024 लहान-मोठे झाडू हातात घेऊन हा मतदारसंघ साफ करायचा आहे ‘, असे देखील ते पुढे म्हणाले.

राम शिंदे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आणि बोलताना, ‘ काहीजणांनी दहा वेळा फोन करून साहेब जाऊ नका असे सांगितले पण माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आहे आणि माझे आणि तानाजी सावंत यांचे मित्रत्वाचे संबंध आहे असे कुठे असते का ? राजकारणात मी हाडाचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याचा नेता झालो नेत्याचा मंत्री झालो आणि त्यांचे चॅलेंज स्वीकारले. मी त्यांना चॅलेंज देतो की विधानसभा निवडणूक लागली की विधानपरिषदेचा राजीनामा देऊन तुमच्यासमोर उभा राहणार आहे ‘, असे देखील राम शिंदे यांनी म्हटलेले आहे .