.. म्हणून ते हेलिकॉप्टरने प्रवास करतात , विखे पाटलांवर गंभीर आरोप

नगर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे जिल्ह्यातील मंत्री आणि खासदार हे हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत असा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी केलेला आहे. किसन आव्हाड यांनी एक प्रसिद्धीपत्रक दिलेले असून त्यामध्ये कल्याण नांदेड निर्मळ या राष्ट्रीय महामार्गमुळे अनेक जणांना अपंगत्व आले असून आतापर्यंत 400 जणांचा बळी गेलेला आहे त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत. रस्ते खराब असल्यामुळे त्यांना हवेतून प्रवास करावा लागत आहे. पाथर्डी तालुक्यातील फराळाच्या कार्यक्रमलादेखील मंत्री महोदय हेलिकॅप्टर घेऊन पोहोचले होते. रस्ते चांगले नाहीत म्हणूनच त्यांना हेलिकॉप्टर मधून यावे लागले असे म्हटले आहे.

नगर निर्मळ रोड हा मृत्यूचा सापळा झालेला असून आत्तापर्यंत त्यामध्ये 400 पेक्षा अधिक लोकांचे बळी गेले आहेत तर बाराशेपेक्षा जास्त लोकांना कायमचे अपंगत्व देखील आलेले आहे. रस्ता चांगला असता तर पाथर्डी तालुक्यातील अनेक नागरिकांना हा रस्ता वरदान ठरला असता मात्र सध्या रस्ता नागरिकांसाठी शाप ठरत असून त्यामुळे पाथर्डी तालुक्याचा विकास फुटलेला आहे िल्ह्यातील मंत्री आणि राजकीय नेत्यांनी रस्त्याचा प्रश्‍न तातडीने सोडून नागरिकांचे प्राण वाचवावे अशी देखील या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे