ट्विटरवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अन महिलांबद्दल आक्षेपार्ह मजकूर , दोन जण ताब्यात

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला खासदार महिला पत्रकार यांच्या विषयी शिवीगाळ करत आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या दोन आरोपीना महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात 28 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट याचा वापर त्यांनी केला होता असे असा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी म्हटले आहे की, 14 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने एक व्यक्ती ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महिला खासदार महिला पत्रकार यांच्याविषयी आक्षेपार्ह शिवीगाळ करून आपत्तिजनक मजकूर ट्विट करत आहे अशी तक्रार केली होती. पोलिसांनी त्यानंतर गुन्हा नोंदवला आणि तपासाला सुरुवात केली.

नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात 28 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दाखल होत दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून गणेश नारायण गोटे ( वय 29 ) याला अटक करण्यात आली आहे तर दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप जप्त करण्यात आलेला आहे तसेच सदर मजकूर हा आरोपीने स्वतः बनवला की इतरांकडून बनवून घेतला त्याचादेखील पोलीस तपास करत आहेत.