महापालिकेकडून आता ‘ मोजून ‘ कारवाईचा इशारा, नागरिकांना अंमलबजावणीची अपेक्षा

नगर शहरात कॅरीबॅगचा वापर सर्रास सुरू असून अनेक दुकानांमधून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना कॅरीबॅग देण्यात येते त्यामध्ये भाजीपाल्यापासून तर चिकनच्या दुकानापर्यंत सर्वांचाच समावेश आहे. सरकारने 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणली असून महापालिकेने आता कारवाई म्हणून प्लॅस्टिकची जाडी मोजण्यासाठी आठ मशीन खरेदी केलेले आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे मात्र नगरकरांना आता अंमलबजावणीचीच अपेक्षा आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाकडून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वस्तूंचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू झाली असून अद्यापही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत हा प्रकार सुरू आहे. शहरातील कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आल्यानंतर अनेकदा व्यापारी आणि दुकानदार यांची बैठकही घेऊन माहिती देण्यात आली आहे मात्र तरीदेखील परिस्थितीत काही बदल झालेला नाही. महापालिका प्रशासनाने आता प्लास्टिकची पिशवी किंवा वस्तूची विक्री करताना आढळून आले तर जागेवरच प्लॅस्टिकची जाडी मोजली जाईल आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच साठवलेला स्टॉप देखील जप्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.