मंत्र्यांनी पकडली बोट प्रकरणात दोन जण निलंबित

त्यांचं झाल्यावर तुमचं सुरु करु नका अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांना देखील कानपिचक्या दिल्या होत्या त्यानंतर नेवासा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वाळू उपसा करणार्‍या बोटी देखील पकडल्या. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नेवासा मंडळाधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे आणि प्रवरासंगम येथील कामगार तलाठी असलेले म्हसे यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 23 ऑक्टोबर रोजी नेवासा दौऱ्यावर असताना त्यांना वाळू उपसा करणार्‍या दोन बोटी आढळून आल्या होत्या. मंत्रि यांनी त्यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती आणि त्या बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

नेवासा मंडळ अधिकारी सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर चार जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेला होता मात्र महसूल मंत्री यांच्या आदेशानंतर या बोटी जप्त करण्यात आल्या आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आक्रमकता अवलंबत सुनील भाऊसाहेब लवांडे आणि म्हसे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.