
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आलेली असून एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मैत्रिणीला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनविण्याचे आमिष दाखवले आणि तिचे काही व्हिडिओ बनवून घेतले. धक्कादायक बाब म्हणजे त्याने हे व्हिडिओ एका वेबसाईटवर टाकले त्यानंतर या प्रकरणाची माहिती मुलीला समजल्यानंतर वारजे पोलिसांनी कायद्याअंतर्गत दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांची सोशल मीडिया वरून ओळख झालेली होती त्यानंतर एकमेकांना भेटल्यानंतर या तरुणीने या मुलीने आपल्याला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार व्हायचे आहे अशी माहिती या मुलांना दिली त्यानंतर त्यांनी तुला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो असे सांगत काही व्हिडिओ तिच्याकडून बनवून घेतले. नग्न स्वरूपातील व्हिडिओ त्यांच्या हातात आल्यानंतर त्याने हे व्हिडिओ त्याच्या मित्राला पाठवले आणि त्याच्या मित्राने ते एका वेबसाईटवर अपलोड केले.
सदर माहिती ही या मुलीला तिच्या मैत्रिणीने सांगितली त्यानंतर तिने घरी घाबरून जात ही माहिती आई वडिलांना सांगितली. पोलिसात गेल्यावर आपली बदनामी होईल असे तिला वाटत होते मात्र स्वतः होऊन अखेर तिने धीर धरत स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत .