हैदराबादची तरुणी उदगीरला पोहचली अन.., आता प्रकरण पोलिसात

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे समोर आली असून हैदराबाद येथील एका 21 वर्षीय युवतीला तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत उदगीर शहराजवळील ठिकाणी असलेल्या लॉजवर नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले . सदर तरुणी ही गर्भवती राहण्याचे समजल्यानंतर आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली आणि लग्नाला नकार दिला. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उदगीर शहरातील ऑटोचालक असलेला आसिफ नावाच्या तरुणाची हैदराबाद येथील एका युवतीसोबत मैत्री होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि 20 मार्च ते ऑगस्ट 22 यादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्यातून ती गर्भवती झाल्यानंतर त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली आणि अखेर लग्नाला नकार दिला.

हतबल झालेल्या तरुणीने आपल्या मजबुरीचा फायदा घेत त्याने आपल्यावर अत्याचार केला तसेच त्याचा दुसरा मित्र रझा बासू पटेल ( राहणार उदगीर ) याने देखील आपल्याला मदत करण्याचा बहाणा करत आपल्यासोबत अत्याचार केला अशी तक्रार दिलेली आहे. रझा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आसिफ हा फरार असल्याची माहिती आहे.