माहेराहून शिकून आली नाहीस का ? , जावयाला माहेरच्या मंडळींनी धो धो धुतले

नगर जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराचे वेगळेच प्रकरण समोर आले असून श्रीरामपूर येथे म्हशीचे पारडू सुटले म्हणून नवरा बायकोचे भांडण झाल्यानंतर सासुरवाडीच्या लोकांनी संतप्त झाल्यानंतर जावयाला घरी जाऊन मारहाण केलेली आहे. पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नीने या प्रकाराची कल्पना माहेरच्या व्यक्तींना दिली त्यानंतर त्यांनी सासरी दाखल होत जावयाला बेदम मारहाण केली.

उपलब्ध माहितीनुसार, विजय भागचंद राऊत ( राहणार अशोक नगर ) असे जावयाचे नाव असून तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की एक तारखेला माझे आणि पत्नीचे किरकोळ वाद झाले होते. म्हशीचे पारडू सुटून दूध पीत असल्याने आपण पत्नीला त्या संदर्भात विचारणा केली त्यावेळी तिने मला घरातील इतरही कामे आहेत असे तिने उत्तर दिले. माहेराहून तू काही शिकून आली नाहीस का ? असे तिला विचारल्यानंतर तिने थांबा माझ्या माहेरच्यांना बोलावून घेते असे म्हणत माहेरी फोन केला होता.

सासूशी बोलताना आपण सासूला झालेला प्रकार सांगितला त्यानंतर मेहुनीने सासूच्या ताब्यातून फोन घेतला आणि तुला जास्त झाले आहे का ? आम्ही येऊन तुला पाहतो ? असे म्हटले. प्रत्यक्षात ते सगळे येणार नाही असे मला वाटले होते मात्र संध्याकाळी सहाच्या सुमारास अनिल भरत सोनवणे, संजय जयराम सोनवणे, रमेश शंकर राऊत आणि रंजना लक्ष्मण माने हे सर्वजण माझ्या घरी आले आणि त्यांनी मला बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.