अखेर राहुरीच्या ‘ त्या ‘ तरुणावर गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यातील राहुरी येथे मागील तीन वर्षापासून एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिची छेड काढत तिला त्रास देणाऱ्या शुभम पवार नावाच्या एका तरुणावर राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शुभम भास्कर पवार ( राहणार तनपुरे वाडी रोड राहुरी ) असे तरुणाचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही पंधरा वर्षीय वयाची असून आरोपी शुभम हा गेल्या तीन वर्षांपासून सतत तिचा पाठलाग करत तिला त्रास देत होता . काही दिवसांपूर्वी त्याने तिला रस्त्यात अडवत मला फोन केला नाही तर तुझी बदनामी करेल असे सांगत तिला फोनवर मेसेज करून तसेच फोन करून तिला भेटायला बोलावले होते. त्याचा त्रास असह्य झाल्यानंतर अखेर मुलीने आईसोबत पोलीस ठाण्यात दाखल होत त्याच्या विरोधात फिर्याद नोंदवली नोंदवली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.