राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात येथे जात असून शिंदे फडणवीस सरकारवर नागरिकांसोबतच विरोधी पक्षांकडून देखील जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठी घोषणा केली असून महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे मात्र हे प्रकल्प कुठले असतील आणि कोणत्या कंपनी असतील या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर सदर प्रकल्पाची नावे जाहीर करण्याची मागणी करण्यात येत असून राज्य सरकारकडून देखील या विषयावर काहीही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी यांनी , केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागात बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे असे सांगत स्टार्ट पाणी लघुउद्योगांना शक्य तेवढी मदत केंद्र सरकार करत आहे त्यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. केंद्र सरकार सध्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे या विकासामुळे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील , असे देखील म्हटले आहे.