मनोहर भिडे यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस , नोटीसमध्ये म्हटलंय की..

कपाळावर टिकली न लावणाऱ्या महिला पत्रकाराशी मी बोलणार नाही असे वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांना राज्य महिला आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्या विधानाचा त्यांनी खुलासा करावा अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केली आहे.

मनोहर भिडे हे मंत्रालयात आले असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी हे विधान केले होते. आपले वक्तव्य हे स्त्री सन्मानाला सामाजिक धक्का पोहोचवणारे आहे असे देखील त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.