‘ हा प्रकार जनतेला आवडलेला नाही ‘, अजित पवार यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबीरात अजित पवार यांनी बोलताना, ‘ राजकारणात राक्षसी महत्त्वाकांक्षा बनलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील आमिष दाखवले जात आहे मात्र कुणाच्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका ‘ असे कार्यकर्त्यांना म्हटलेलं आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘ शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा प्रकार जनतेला आवडला नाही. पक्षातून वेगळे होणे एक वेळ आपण समजू शकतो मात्र घरच उध्वस्त करण्याची बेइमानी कुणालाही पटलेली नाही. ‘ राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज कार्यकर्ते सध्या शिर्डी येथे कार्यकर्ते आणि नेते शिर्डी येथे सध्या दाखल असून राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.