महिलेने गमावले प्राण , ‘ त्या ‘ व्यावसायिकाच्या विरोधात तोफखान्यात गुन्हा दाखल

कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. कोरोना संकट कमी झाल्यानंतर तरी ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती मात्र सध्या देखील एका महिलेने ऑक्सीजन मशीन अचानकपणे बंद पडल्यानंतर आपले प्राण गमावले आहेत. नगर इथे ही धक्कादायक घटना उघडकीला आले असून पीडित परिवाराने हे मशीन नाशिकवरून आणले होते. मे २०२२ मध्ये ही घटना घडली होती त्यानंतर अखेर सदर मशीन देणाऱ्या पुरवणाऱ्या वरद इंटरप्राईजेस या कंपनीचा मालक रुपेश मधुकर वरखेडे ( राहणार नाशिक ) याच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मीबाई सुरेश बेलदार ( राहणार श्रीरामपूर ) असे मयत महिलेचे नाव असून त्यांना थंडी ताप आल्यामुळे नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यावेळी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे ऑक्सिजनची कमतरता असल्याने ऑक्सिजन पुरवठा करणारे मशीन उपलब्ध नव्हते. डॉक्टरांनी सदर मशीन तुम्ही उपलब्ध करून द्या अशी विनंती केल्यानंतर पीडित परिवाराने मशिनसाठी शोध सुरू केला.

इंटरनेटवर माहिती घेतल्यानंतर मयत महिलेच्या मुलाने वरद एंटरप्राइजेस यांच्याशी संपर्क साधला होता त्यावेळी त्यांनी मशीन उपलब्ध आहे मात्र आधी पैसे पाठवा त्यानंतर मशीन देतो असे सांगितले. मुलाने नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन मशीन मिळावे म्हणून हे पैसे कंपनीच्या नावाने जमा केले मात्र त्यानंतर कंपनीने मशीन तुम्हाला येऊन घेऊन जावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मुलाने नाशिक येथील त्याच्या एका मित्राला यासंदर्भात माहिती दिली आणि नाशिकमधील हा मित्र मशीन घेऊन नगरला आला. काही काळ रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर अचानकपणे हे मशीन बंद पडले आणि 14 मे रोजी लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. आरोपीच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात कलम 304 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.