नगर-मनमाड महामार्गासाठी आठशे कोटींचा निधी , सुजय विखे म्हणतात की..

शेअर करा

नगर-मनमाड महामार्गाच्या कामासाठी आता नव्याने आठशे कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि जानेवारी महिन्यात या कामाला सुरुवात होईल अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे . नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था पाहता अनेक नागरिकांकडून या विषयी संताप व्यक्त केला जात होता तसेच देशभरातून शिर्डी येथे भाविक येत असल्याने दुर्दैवाने नगरच्या रस्त्याची देखील देशभरात चर्चा होत होती.

सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील काही दिवसांपासून या मार्गाची निविदा प्रक्रिया तात्काळ व्हावी म्हणून आपण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता त्याला यश आले असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ते विकासाचा मोठा कार्यक्रम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून या महामार्गाचे काम कमी कालावधीत आणि गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी आणखी आठशे कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन जानेवारी महिन्यात या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट आहे ‘, असे देखील ते पुढे म्हणाले .


शेअर करा