श्रीरामपूर हादरलं..तीन अपत्ये असलेल्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात येथे उघडकीला आली असून शहरातील दत्तनगर परिसरात असलेल्या एका होमगार्डने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला पत्नीसह तीन मुले देखील आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, अनिल छगन बनकर ( वय 42 वर्ष ) असे आरोपीचे नाव असून होमगार्ड म्हणून तो काम करतो. अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत जात असताना अनेकदा त्याने तिचा पाठलाग केला त्यानंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने लॉजवर आणि त्याच्या घरात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीच्या वडिलांनी अखेर पोलिसात दाखल होऊन त्याच्या विरोधात फिर्याद दिली असून पोक्सो कायदासह इतर कलमान्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत.


शेअर करा