‘ मुंबईत आली तर तुकडे तुकडे करून फेकून देईन ‘ , पीडित महिला कोतवालीत दाखल

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यात नगर शहरात समोर आलेले असून तू जर माझ्या पतीसोबत मुंबईला राहिली तर तुझे तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून देईल अशी धमकी या व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला दिलेली असून पतीने दुसऱ्या पत्नीला घरातून हाकलून दिले त्यानंतर पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात मुंबईत राहणारा तिचा पती सुभाष भदर्गे याच्या विरोधात गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही 45 वर्षीय असून मुंबईजवळ नालासोपारा येथे राहते. सध्या ती केडगाव येथे राहत असून तिच्या पहिल्या पतीचे हृदयविकाराने निधन झालेले आहे त्यानंतर तिने तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून एका शाळेवर शिक्षक असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता . 19 जानेवारी 2022 रोजी तिने सुभाष नामदेव भदर्गे ( वय 53 राहणार किनी कॉम्प्लेक्स पालघर ) याच्यासोबत नगर शहरातील केडगाव येथे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्नही केले होते त्यानंतर दोघे नालासोपारा येथे राहायला गेले मात्र महिलेचा दीर निवृत्ती याने महिलेला घरी येऊन शिवीगाळ करण्यास सुरू केली.

निवृत्ती हा आपल्या नवऱ्याचे कान भरतो आणि त्यातून आपला पती आपल्याला मारहाण करतो असे महिलेचे म्हणणे असून दोन महिन्यानंतर महिलेची सासू राईबाई ही देखील तिथे राहायला आली आणि आणि तिनेही या महिलेचा छळ सुरू केला. पती सुभाषने आपल्याला घरून पैसे आणण्यास सांगितले त्यानंतर आपण आपल्या आईचे दागिने मोडून त्याला पैसे दिले मात्र पतीने विवाहाच्या वेळी आपले पहिले लग्न झालेले आहे हीदेखील माहिती आपल्यापासून दडवली होती.

अचानक एके दिवशी सुभाष यांची पहिली पत्नी आयोध्या ही घरी आली आणि तिने ‘ तू जर पुन्हा मुंबईत राहिलीस तर तुझ्या घरी येऊन तुझे तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून देईल ‘ अशी धमकी दिली . अचानकपणे ती घरी आल्यानंतर पती घाबरून गेला आणि त्याने 9 सप्टेंबर २०२२ रोजी पीडित महिलेला घरातून बाहेर काढले. फक्त अंगावरील कपड्यासह पतीने बाहेर काढल्यामुळे पीडित महिला हतबल झालेली होती त्यानंतर ती केडगाव येथे तिच्या आईच्या घरी आली त्यावेळी पहिली पत्नी आयोध्या हिने तिला फोन करून पुन्हा मुंबईला आली तर तुला संपवून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर पीडित महिलेने भरोसा सेलमध्ये तक्रार केली असून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.