
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबिया देशातून मध्य प्रदेशातील जंगलात आठ चित्ते आणले होते याची त्यांपैकी दोन चित्त्यांना मोठ्या संरक्षण संरक्षित केलेल्या कुंपणाला सोडण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. सर्व चित्ते निरोगी आणि सक्रिय झाले असून परिस्थितीशी जुळवून घेत आहेत हे जाणून मला आनंद झाला आहे, असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी चित्त्यांना त्यांना मोकळ्या उद्यानात सोडतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला असून त्यांना संरक्षित वातावरणात सोडण्यात आलेले आहे. उद्यानातील वातावरणाशी जुळवून घेण्यात घेता यावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे पाहून मलाही आनंद झालेला आहे असे म्हटलेले आहे. उरलेल्या सहा चित्त्यांना देखील लवकरच मोठ्या कुंपणात सोडले जाईल असे वनअधिकाऱ्यांनी सांगितले असून मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना मध्यप्रदेश येथील उद्यानात सोडण्यात आले होते. नेहमीप्रमाणे याचा मोठा उत्सव गोदी मीडिया आणि भाजपकडून साजरा केला गेला.