एकीकडे लग्न तर दुसरीकडे पतीच्या जावेसोबत ‘ रंगरलीया ‘ होत्या सुरु मात्र..

शात एक खळबळजनक अशी घटना समोर आले असून उत्तर प्रदेशातील पिलभीत इथे एका पत्नीने तिच्या पतीला जावेसोबत रंगेहात पकडलेले आहे त्यानंतर हा प्रकार जावेचा पती आणि मेव्हणी यांना समजताच त्यांना धक्काच बसला त्यानंतर सर्वांनी पीडित पत्नीवर प्रकरण दाबून घेण्यासाठी दबाव टाकला मात्र त्यानंतर ऐकत नाही हे समजल्यानंतर पतीने तिला फाशी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रिया गौतम असे पीडित महिलेचे नाव असून गुरुवारी शेजार्‍याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्यावेळी लग्नसमारंभासाठी कुटुंबातील सर्व सदस्य तिथे गेले होते याच दरम्यान पती आणि तिची जाव यांनी संधीचा फायदा घेत घरात रंगरलिया साजरी करण्यास सुरुवात केली होती. अचानकपणे पत्नी घरी पोहोचली त्यावेळी तिचा पती आणि तिची जाव ‘ नको त्या ‘ अवस्थेत आढळून आले त्यानंतर जावेने गडबडीत खोलीला कुलूप लावून घेतले.

पतीने आपल्याला हे प्रकरण कोणाला सांगू नकोस असे सांगत धमकावले त्यानंतर देखील पत्नीने मी माझ्या घरच्यांना सांगणार आहे असे म्हटल्यानंतर पतीने तिला बेदम मारहाण केली त्यानंतर घरातील सासू-सासरे व इतर जणांनी देखील हे प्रकरण घरातल्या घरात लपवून ठेवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला असे म्हटले. पत्नीने विरोध केला असता साडीला गळफास लावून आपण आत्महत्या करत आहोत अशा स्वरूपाचा बनाव निर्माण करून आपला जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असे देखील पीडितेने म्हटले आहे. मारहाण केल्यानंतर प्रीती यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मुख्य आरोपी असलेला महिलेचा पती मात्र फरार झालेला आहे.