‘ प्रेम केलं खेळ नाही ‘ , फेसबुक लाईव्हवर कटरने कापला गळा

देशात एक खळबळजनक अशी घटना हैदराबाद येथील समोर आली असून प्रेयसीने धोका दिल्याचा आरोप करत मंगळवारी एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करताना अचानक पणे रॉडकटरने स्वतःचा गळा कापून घेतला. सदर तरुण हा उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी असल्याची माहिती असून त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ हैदराबादकडे धाव घेतलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार सदर तरुणाचे नाव शैलेश असे असून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. कामानिमित्त तो हैदराबाद येथे गेला त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी तिचे इतरत्र लग्न ठरवलेले होते. तरुणाने तिच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्याचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यातून तो नैराश्यात गेलेला होता. आपली प्रेयसी आपल्याला भेटत नाही तर आपल्याला तिच्याशी संपर्कही करता येत नाही म्हणून तो हतबल झाला.

फेसबुक लाईव्ह वर आल्यानंतर त्याने ‘ सगळ्या मित्रांना विनंती आहे माझं लग्न झालं नाही त्याप्रमाणे तिचे देखील लग्न होऊ देऊ नका. मी प्रेम केलं होतं खेळ नव्हता ‘ असे म्हणत अचानकपणे बाजूला ठेवलेले कटर मशीन हातात घेतले आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून घेतला. गावातील काही व्यक्तींनी त्याला लाईव्ह वर पाहिल्याची माहिती कुटुंबीयांना दिली त्यावेळी त्यांनी हैदराबादमधील त्यांच्या ओळखीच्या लोकांना फोन केला अन त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते