श्रीगोंद्यात प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

शेअर करा

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक असलेले नामदेव बाजीराव गाढवे ( वय 48 ) यांनी शहरातील शिवाजीनगर परिसरात राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलेला असून प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना ही आठ तारखेला पहाटे पाचच्या सुमारास घडली असून घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकाने आत्महत्या केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .


शेअर करा