खळबळजनक..उसाच्या ट्रॅक्टरवर डोळा लागला अन अचानक झाले वार

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना परभणी जिल्ह्यात समोर आलेली असून पाथरी परिसरात उसाच्या ट्रॅक्टरवर झोपलेला असताना एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी तुझे अनैतिक संबंध आहेत असा आरोप करत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखाना परिसरात चार नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पाथरी तालुक्यातील तुरा येथे रहिवासी असलेले सय्यद हनीफ रईस सय्यद हे रेणुका शुगर साखर कारखाना साइटवर 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास उसाच्या ट्रॅक्टरवर झोपलेले असताना तिथे आरोपी अशोक भाग्यवंत ( राहणार पाथरगव्हाण ) हा आला आणि त्याने सय्यद त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. सय्यद तेथून पळून जाऊ लागले त्यावेळी अशोक हा त्यांचा पाठलाग करत त्याच्यावर वार करत होता. घाबरलेल्या अवस्थेत सय्यद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अशोक भाग्यवंत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे