नगर शहरात महिलेचा फोटो वापरून ‘ कॉलेजगर्ल पुणे ‘

शेअर करा

नगर येथे एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून एका वेबसाईटवर नगरमधील एका महिलेचे बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे संबंधित महिलेची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

रविवारी सहा तारखेला सायबर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली असून तिला तिच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला होता त्यामध्ये तिच्या मोबाईल नंबरचा वापर करत तिच्या नावाने सोशल मीडियावर तिचे अकाउंट बनून तिच्या नावाच्या पुढे ‘ कॉलेजगर्ल पुणे ‘ असे लिहून अकाउंट तयार करण्यात आले होते. तिचा मोबाईल नंबर देखील तिथे टाकला गेल्याने एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधलेला होता. तिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत असल्याचे समजते


शेअर करा