ब्रेकिंग.. युवकाला मारहाण प्रकरणावर अमोल कोल्हे काय म्हणतात ? : पहा व्हिडीओ

शेअर करा

अक्षय बोऱ्हाडे या युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ह्या प्रकरणाची उदयनराजे यांनी देखील दखल घेऊन चिंता व्यक्त केली होती .अक्षय बोऱ्हाडे असे या युवकाचे नाव असून त्याने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत . खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे तर दुसरीकडे मारहाण केल्याचा आरोप असलेले व्यक्ती सत्यशील शेरकर हे खासदार अमोल कोल्हे यांचे खास मित्र असून अमोल कोल्हे यांनी देखील आता ह्या घटनेबद्दल ट्विटरवर येऊन स्पष्टीकरण दिले आहे .

ट्विटरवर खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ अपलोड केला आहे त्यात ते म्हणतात, ” काल सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ प्रसारित झाला आणि त्यामुळे मला कित्येक जणांनी फोन केले. अक्षय जो काही सामाजिक कार्य करतो आहे त्या कार्याविषयी आदर ठेवून मी हे सांगू इच्छितो कि ह्या व्हिडिओमध्ये ज्याच्यावर आरोप करण्यात आलेत, ते सत्यशील शेरकर आणि मी हे समाजकारणात येण्याच्या आधीपासूनचे अत्यंत चांगले मित्र आहोत. त्यामुळे सत्यशील शेरकरांना देखील मी अगदी जवळून ओळखतो आणि हे सांगत असताना मी हेही स्पष्टपणे सांगतो की ह्या प्रकरणामध्ये जर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी यापूर्वीच दिलेल्या आहेत, पण हे करत असताना अक्षय बोऱ्हाडे यांनी जो व्हिडीओ प्रसारित केलेला आहे ही नाण्याची एक बाजू असू शकते, ह्या नाण्याची दुसरी बाजू ही स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर वर असे अनेक पदर दुसऱ्या बाजूला असू शकतात. आणि अशा प्रकारे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे जर आपण आपले मत बनवत असू तर यापुढे एखाद्याच्या समाजकारणातल्या राजकारणातल्या कारकिर्दीला बट्टा लावण्याचे धोका यापुढील काळात राहणार आहे “

याच व्हिडीओ पुढे अमोल कोल्हे यांनी लोकांना कळकळीची विनंती केली की, ” समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या एकाच बाजूवर आपले मत पूर्णपणे बनवण्यापेक्षा नाण्याला दुसरी बाजू असू शकते आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सत्यशील शेरकर यांची सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा पोलीस यंत्रणेला याचा सखोल तपास करुद्या . या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, याची मी आपल्याला ग्वाही देतो

काय हे प्रकरण ?

मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये या तरुणाने दावा केला होता की, ” गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. सत्यशील शेरकर अशा काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, असे देखील आव्हान ह्या युवकाने केले होते .

संबंधित बातम्या

पुन्हा एकदा एका युवकाला बंगल्यावर नेऊन मारहाणीचा आरोप , उदयनराजे यांनी देखील घेतली दखल : कुठे घडली घटना ?
https://nagarchaufer.com/?p=191

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=154

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142

देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्राकडून २८ हजार कोटींच्या दाव्याची महाविकास आघाडीकडून पोलखोल : पॉईंट टू पॉईंट
https://nagarchaufer.com/?p=177

सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=181

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पोलखोल करताच भाजपचा थयथयाट सुरु, कोणी केले तब्बल आठ ट्विट्स ?
https://nagarchaufer.com/?p=188


शेअर करा