‘ त्यांना ‘ अडकवण्याचा बहाणा केला अन घेतला पोटच्या मुलीचा जीव

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नागपूरला समोर आली असून आपली दुसरी पत्नी तिचा भाऊ आणि तिच्या वडिलांना फसवण्यासाठी स्वतःच्या मुलीला गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचा देखावा करण्यास त्याने सांगितले मात्र याच दरम्यान वडिलांनी तिच्या पायाखाली ठेवलेला स्टूल ओढला आणि तिला ठार केले. सीआयडी आणि क्राइम पेट्रोल पाहून त्याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली असून मयत मुलीची सावत्र आई सावत्र मामा आणि मामीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार अश्विनी दुर्गाप्रसाद देशभ्रतार ( वय 29 राहणार वर्धमान नगर नंदनवन नागपुर ) यांची बहीण आरती हिचे गुड्डू छोटेलाल रजक नावाच्या चाळीस वर्षीय व्यक्तीसोबत लग्न झालेले होते. आरती हिने 2016 साली विष पिऊन आत्महत्या केली त्यानंतर गुड्डू रजक याने 2018 मध्ये कौशल्या पेपरडे नावाच्या महिलेसोबत लग्न केले आणि ते दोघे संसार करू लागले. गुड्डू याला पहिल्या पत्नीपासून 16 वर्षीय एक मुलगी आणि बारा वर्षाची एक मुलगी आहे.

6 नोव्हेंबर रोजी मोठी मुलगी माही हिने आत्महत्या केली त्यावेळी सर्वप्रथम तिची मावशी असलेली अश्विनी हिला कळविण्यात आले त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर माहि हिने लिहून ठेवलेली एक सुसाइड नोट सापडली त्यामध्ये कौशल्या ही सावत्र आई, दशरथ पेपरडे, कल्पना पेपरडे हे लग्न करण्यासाठी आपल्याला त्रास देत आहे तसेच सावत्र मामा आपल्यावर लैंगिक अत्याचार करतो त्यामुळे आपण आत्महत्या करत आहे असे लिहिलेले होते. फिर्यादी यांनी तक्रार दाखल केल्यावर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

सदर प्रकरणी तपास सुरू असताना कळमना पोलिसांनी सर्वप्रथम तिचा पिता असलेला गुड्डू रजक याचा मोबाईल फोन जप्त केला त्यावेळी त्यामध्ये सहा नोव्हेंबरला पहाटे तीनच्या सुमारास माही ही एका स्टुलावर उभे राहून गळ्यात दोरी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली त्यावेळी तिच्या गळ्यातील दोरी ढिली होती आणि फोटोमध्ये तिचे डोळे उघडे असून ती कुणाशी तरी बोलत असल्याचे दिसून आले त्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि फोटोंचे आणखी खोलवर जाऊन विश्लेषण केले असता त्यामध्ये आढळून आला तिचा बाप आढळून आला त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्याने आपण ही सुसाईड नोट तिच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतली होती असे देखील त्याने सांगितले.

गुड्डू याने त्याच्या दोन्ही मुलींना रात्री झोपेतून उठून गळफास लावण्याचा देखावा कर मी त्याचे फोटो काढतो आणि आणि तुझा सावत्र मामा आणि मामीला फसवतो असे सांगितले होते. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून मुली गेल्या होत्या मात्र त्यावेळी गुड्डू याने माही हिला व्हिडिओ बनवण्याआधी काय बोलायचे होते त्याची कल्पना दिली आणि त्यानंतर व्हिडिओ बनवत असताना अचानकपणे स्टूलला लाथ मारून तो खाली पाडला त्यानंतर माही हिच्या गळ्याला फास आवळला गेला आणि तिचा मृत्यू झाला.

लहान मुलीला गुड्डू याने धमकी देत शांत राहण्यास सांगितले होते. सगळा प्लॅन त्याने क्राइम पेट्रोल मध्ये पाहून केल्याची माहिती पोलिसांना दिली असून दुसरी पत्नी, तिचा भाऊ आणि वडील यांना फसवण्यासाठी आपण हे सर्व केले असे म्हटले आहे. अत्यंत किचकट स्वरूपाच्या या गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केलेली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदा दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत मात्र दुर्दैवाने एका मुलीचा यात मृत्यू झालेला आहे.