नगर शहरात चिकनच्या विक्रेत्याला ‘ बाजूला ‘ घेऊन वार

शेअर करा

नगर येथे एक खळबळजनक अशी घटना तपोवन रोड परिसरात उघडकीला आली असून चिकनची उधारी मागितली म्हणून दुकानदाराला लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सागर एकनाथ अवसरे ( राहणार निर्मल नगर ) यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिलेली असून सागर यांचे तपोवन रोडवर चिकनचे दुकान आहे. आरोपी आकाश जाधव आणि साहिल शिंदे हे दोघे सोमवारी चिकन खरेदी करण्यासाठी दुकानावर आले होते त्यावेळी सागर यांनी त्यांना आधीची सातशे पन्नास रुपयांची उधारी मागितली त्यावरून आरोपींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याच्याशी हुज्जत घालत तुला पाहून घेऊ असे म्हणून ते गेले.

संध्याकाळी प्रकरणातील दुसरे आरोपी शरद फुलारी आणि विशाल शिंदे हे दोघे सागर अवसरे यांच्याकडे आले आणि त्यांनी सकाळी झालेल्या प्रकाराबद्दल तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत त्यांना बाजूला घेतले यावेळी आकाश जाधव आणि साहिल शिंदे हे दोघे दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील हत्याराने अवसरे यांच्या डोक्यात वार केला. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला त्यानंतर अवसरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.


शेअर करा