‘ आधारकार्ड आणते ‘ म्हणत मांडवातून नवरी गायब , वरपक्षाने पाठलाग केला अन..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना कोल्हापुरात समोर आलेली असून लग्नाला काही दिवस बाकी असताना नवरी आणि एक महिला तसेच दोन पुरुष यांनी 80 हजार रुपये घेऊन मांडवातून पलायन केलेले आहे. करवीर तालुक्यातील एका गावात ही घटना घडलेली असून अक्षरश: वर पक्षाच्या नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग देखील केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.

उपलब्ध माहितीनुसार, करवीर तालुक्यातील एका गावातील एका एजंटला 50 हजार रुपये देण्याचे कबूल करून लग्न ठरविण्यात आले होते मात्र लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागल्यावर या व्यक्तीने आपली रक्कम वाढवत 80 हजारांपर्यंत मागणी केली. त्यानंतर मुलाकडील मंडळींनी 50 हजार रुपये घेऊन पन्हाळा तालुक्यातील एका गावात लग्न लागण्याचा आशेने ते दाखल झाले मात्र ऐन वेळेस 30 हजार रुपयांची आणखी मागणी झाल्यावर अक्षरश: दहा टक्के व्याजाने काढून पैसे काढून ते एजंटला देण्यात आले.

मुलाकडील मंडळींनी या वेळी नवरी मुलीचे आधार कार्ड मागितले मात्र तिचे आधार कार्ड गावी राहिले आहे असे सांगण्यात आले आणि त्यानंतर गाडीत आधार कार्ड आहे का बघतो असे म्हणत एकापाठोपाठ एकजण गाडीपर्यंत पोहोचले आणि गाडी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघून गेले. वराकडील मंडळींना असे काही होईल याची अपेक्षाच नव्हती त्यांनीही चक्क त्यांचा पाठलाग केला मात्र त्यात त्यांना अपयश आले. मुलाच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले असून एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच लग्न करावे नाहीतर तीन वर्षे लग्न करता येत नाही अशी आमच्याकडे प्रथा असल्याने आम्ही घाईत होतो मात्र त्याचा गैरफायदा समोरच्या व्यक्तीने घेतला असे म्हटले आहे.