चक्कर आल्याचे सुनेने केले ढोंग , सासू खोलीत पोहचली तेव्हा..

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून अवघ्या 21 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका पत्नीने पती आवडत नसल्याने त्याचा खून केलेला आहे. बीड जिल्ह्यात ही घटना घडली असून 7 नोव्हेंबर रोजी पत्नीने पतीचा खून केला. पतीच्या आईला शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यावेळी आपला पती आपल्याला आवडत नाही म्हणून आपण त्याचा खून केला आहे याची कबुली दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी या दाम्पत्याचा विवाह संपन्न झालेला होता. पांडुरंग राजाभाऊ चव्हाण ( राहणार निपाणी जवळका तांडा गेवराई) असे मयत पतीचे नाव असून त्याची पत्नी शीतल हिने त्याचा खून केलेला आहे. पांडुरंग आपल्याला आवडत नाही म्हणून ती सतत त्याच्यासोबत लग्न झाल्यापासून वाद घालत होती. 7 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास दोघे झोपले असताना शितल खोलीबाहेर आली आणि आणि आपल्या पतीला चक्कर आलेली आहे असे तिने सासूला सांगितले.

आपला पती हालचाल करत नाही हे पाहून मला चक्कर आली आहे असे तिने सासूला सांगितले त्यानंतर पतीच्या आईने परिसरातील नातलगांच्या मदतीने पांडुरंग यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले. आपल्या सुनेने आपल्या मुलाचा खून केला आहे अशी शंका मुलाच्या पांडुरंग यांच्या आईने व्यक्त करत पोलिसात धाव घेतली त्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा तिने आपल्याला पती आवडत नाही म्हणून आपण त्याचा खून केला आहे याची कबुली दिली.