शारीरिक शिक्षण सुरु असताना महिला शिक्षक विद्यार्थिनीच्या प्रेमात

देशात एक खळबळजनक अशी घटना राजस्थानमधील भरतपूर येथे समोर आलेली असून डीग नावाच्या शहरात एक महिला शिक्षक तिची विद्यार्थिनी असलेल्या कल्पना नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडली. त्यांच्यातील प्रेम प्रकरण हे तब्बल पाच वर्ष सुरू होते त्यानंतर घरी माहिती समजल्यानंतर घरच्यांनी देखील या लग्नाला होकार दिला मात्र या शिक्षिकेला लिंग बदलून घेण्यास सांगण्यात आले. शिक्षिकेचे नाव मीरा असे असून लिंग बदल केल्यानंतर तिने आरव असे नाव धारण केलेले आहे आणि आरव आणि कल्पना यांचा विवाह पार पडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मीरा ही मुलगी म्हणून जन्म आली होती मात्र तिचे सगळे हावभाव हे मुलांसारखेच होते त्यानंतर तिला सरकारी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली मात्र ती शारीरिक शिक्षण शिकवायची. कबड्डीमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता त्यावेळी तिची आणि कल्पना यांची मैत्री झाली. शाळेच्या संघाला सोबत नेण्यासाठी मीरा ही कल्पना सोबत जायची त्यावेळी त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले .दोन मुलींचे लग्न ही संकल्पना कुटुंबियांना मान्य मान्य नव्हती त्यामुळे मीरा हिने आपण लिंगबदल करून घेणार आहोत असे सांगितल्यानंतर घरच्यांनी या विवाहाला संमती दर्शवली.

2019 पासून 2021 पर्यंत मीरा हिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि यावेळी तिची मैत्रीण कल्पना हिने तिची पूर्ण काळजी घेतली त्यानंतर आरव मीराचा झाला आणि त्याने कल्पना हीला प्रपोज केले त्यावेळेस तिने होकार दिला मात्र लग्नासाठी घरच्यांशी बोलावे लागेल असे देखील सांगितले त्यानंतर आरव याने त्यानंतर कल्पना हिच्या घरच्यांशी बोल बोलणे केले आणि लग्नाला संमती मिळवली.