महाविकासला उमेदवार सुद्धा मिळू देणार नाही , उद्धव ठाकरे फक्त बोलघेवडे

शेअर करा

येत्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार आणि 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात भाजपा नंबर एकचा पक्ष कसा होईल या दृष्टीने आमची संघटनात्मक बांधणी सुरू असून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अंकित झालेले आहेत. सत्ता गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले असून सत्तेतून ज्यांनी पैसा कमावला ते सध्या घाबरलेले आहेत. आमचे सरकार काम करत नाही असे ते म्हणत असतील तर त्यांनी कोर्टाकडून ऑर्डर आणावी आणि सोबत असे पुरावे सादर करावेत.

उद्धव ठाकरे हे फक्त बोलघेवडे असून त्यांच्यावर कोणी जादू केली हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पवारांच्या जो कोणी नादाला लागतो तो सहजासहजी सुटत नाही त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. चुकीच्या मार्गाला जाऊन बनवलेले हे सरकार असून अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले असे देखील बावनकुळे पुढे म्हणाले.


शेअर करा