‘ मी गावचा दादा आहे ‘, पोलीस घेऊन जात असतानाच चुलती गाडीसमोर

महाराष्ट्रात सध्या दुर्दैवाने कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढलेले पाहायला मिळत आहे असाच एक प्रकार सध्या पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे समोर आलेला असून गहिनीनाथ यांच्या यात्रेत पोलिस बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या एका तरुणाला घेऊन जात असताना दोन महिलांनी पोलीस गाडी अडवत शासकीय कामात अडथळा आणलेला आहे.

सदर प्रकरणी पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पागोरी पिंपळगाव येथे तीन दिवस यात्रा सुरू आहे. गुरुवारी रात्री आर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी सहाय्यक फौजदार लक्ष्मण पवार, अल्ताफ शेख, एकनाथ बुधवंत, अमोल शिवाजी कर्डीले हे पोलिस बंदोबस्तावर होते. रात्री बाराच्या दरम्यान आर्केस्ट्रा आवाज सुरू होता त्यावेळी अशपाक अकबर शेख हा तिथे आला आणि ‘ मी गावचा दादा आहे, आर्केस्ट्रा बंद करा. कोणाला विचारून गाणे लावले ‘, असे म्हणत त्याने पोलिसांसमोर वाद घालण्यास सुरुवात केली .

पोलीस कर्मचारी त्याला समजावून सांगत असताना त्याने पोलिसांशी धक्काबुक्की केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई म्हणून त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची बहीण शेख आणि त्याची चुलती मुन्नीबाई शेख यांनी पोलिसांसोबत झटापट केली आणि पोलिसांच्या गाडी समोर बसून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अमोल कर्डिले यांनी त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.