पत्नी प्रियकरासोबत लॉजवर गेल्याची पतीला मिळाली टीप.. पुढे घडले ‘ असे काही ‘ ? : पहा व्हिडीओ

शेअर करा

लॉकडाऊनच्या काळात लफडेबाज व्यक्तींचे चांगलेच हाल होत असून यातून देखील मार्ग शोधत काही प्रेमप्रकरणे सुरु आहेतच मात्र अशाच एका विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पत्नीस आणि तिच्या प्रियकरास तिच्या पतीने रंगेहाथ प्रियकरासोबत लॉजमध्ये पकडले आणि दोघांच्याही कानाखाली वाजवल्या .पत्नीला चपलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून घटना उत्तर प्रदेशातील ताज नगरी आग्रा येथील आहे .

उपलब्ध माहितीनुसार,आपल्या पत्नीचे अवैध संबंध असल्याचा पतीला अनेक दिवसांपासून संशय होता. पत्नीच्या नकळत तो तिच्यावर नजर ठेवून होता मात्र पत्नीला याची जाणीव नव्हती. ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी लॉजवर पोहचली आणि पाठोपाठ तिचा पती देखील तिथे पोहचला. पत्नीला याची कुठलीच जाणीव नसल्याने तिचे प्रियकरासोबत अश्लिल चाळे सुरु होते.

अचानक नको त्या वेळी पती लॉजच्या रूममध्ये घुसल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराची चांगलीच धांदल उडाली. पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहताच पतीची तळपायाची आग मस्तकात गेली. प्रियकरासोबत गुलछर्रे उडवत असताना पाहून तो संतापला आणि शिव्या देत त्याने त्या दोघांचीही जबरदस्त धुलाई सुरु केली. पत्नीला अत्यंत अमानुषपणे मारणाऱ्या पतीने तिचे काही एक ऐकून घेतले नाही.

सदर महिलेच्या पतीला सुरुवातीला हॉटेलमध्ये सोडत नव्हते मात्र तरीही तो घुसला आणि रुममध्ये जाऊन पाहिलं तर पत्नी आणि प्रियकर नको त्या अवस्थेत दिसले. याचा राग डोक्यात ठेवून पतीनं मारहाण करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अत्यंत अमानुषपणे मारणाऱ्या पतीबद्दल देखील लोकांनी संताप व्यक्त केला आहे तर पतीबद्दल देखील काही लोक ‘ जे केलं ते चांगलं केलं ‘ असे देखील म्हणत आहेत.


शेअर करा