‘ आम्ही जे केलं तेच विकून तुम्ही खाताय ‘ , भाजपवर काँग्रेसचा हल्लाबोल

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून बहुतांश नागरिक स्वयंस्फूर्तीने या यात्रेत दाखल होत आहेत . खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्याच सभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला असून विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये फिरवून सर्वसामान्य नागरिकांचे दुःख समजणार नाही. आजमितीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहेत त्यामुळे शाळेत संगणक देखील नाहीत तिकडे पंपाचे बटन दाबले की तिकडे तुमच्या खिशातील पैसा थेट उद्योगपतीपर्यंत पोचतो ,’ असे म्हटलेले आहे.

नांदेड येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘ स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतीच्या मालावर देखील जीएसटी भरावा लागत आहे. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाही तर मालाला हमीभाव देखील मिळत नाही. छोटे व्यापारी हैराण झाले असून तरुणांना देखील नोकरी मिळत नाही. त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आम्ही पायी भारत जोडो यात्रा काढलेली असून कुठलीही शक्ती आमच्या यात्रेला रोखू शकत नाही. काश्मीरला जाऊन आम्ही तिरंगा फडकवणार आहोत, ‘ असे देखील राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘ भारत देश हा तपस्वीचा देश असून तपस्वीपुढे देश आपली मान झुकवतो. देशातील मजूर व्यापारी शेतकरी हे एक प्रकारे तपस्या करत असून त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळत नाहीत कारण आता वेगळ्या पद्धतीचे तपस्वी या देशात दिसत आहेत ‘, असे देखील राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी यावेळी आलेल्या एका विद्यार्थ्याला लॅपटॉप देखील भेट घेऊन दिला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, ‘ भाजप आणि आरएसएस आम्हाला आता विचारत आहेत की सत्तर वर्षात तुम्ही काय केले. जे आम्ही केले तेच तुम्ही विकून खात आहात. पब्लिक सेक्टर सध्या तुम्ही विकत असून केवळ फोटोग्राफी आणि जुमलेबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहात. सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाची पूजा करत नाही तर फक्त आम्हाला शिव्या घालता कारण आम्हाला शिव्या घातल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही. काँग्रेसने संविधान धोक्यात आणले अशी ओरड तुम्ही सतत करतात मात्र जर काँग्रेसने संविधान धोक्यात आणले असते तर तुम्ही पंतप्रधानच झालेच नसता. दरवर्षी दोन कोटी रोजगार 15 लाख रुपये कुठे गेले ? असा देखील खडा सवाल खरगे यांनी विचारलेला आहे .


शेअर करा