नगर पोलिसांनी सांगलीत जाऊन ‘ योगेश ‘ ला मुलीसोबत ताब्यात घेतले

नगर येथे एक खळबळजनक घटना समोर आली असून तालुक्‍यातील एका 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी सांगली जिल्ह्यात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. इस्लामपूर येथून त्याला अटक करण्यात आलेली असून योगेश कचरू गायकवाड ( वय 20 बुरुडगाव रोड नगर ) असे आरोपीचे नाव आहे.

सदर प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही दरम्यानच्या काळात पीडित मुलगी आणि आरोपी हे सांगली जिल्ह्यात असल्याची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवकुमार देशमुख, शिशिर कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक सांगलीला रवाना झाले आणि त्यांना गोटखिंडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

सांगलीतील आष्टा पोलिस ठाण्यात त्यांना सुरुवातीला हजर करण्यात आले होते त्यानंतर पीडित मुलीसोबत आरोपीला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहे. आरोपी योगेश गायकवाड यांच्यावर 376 2 तसेच इतर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस अधिक्षक अनिल कातकडे करत आहेत.