कोंडवाडा विभाग नेमका कोणाला कोंडतो ? नगरकर हैराण

शेअर करा

नगर शहरात सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून महापालिकेकडून केवळ जुजबी आश्वासन या पलीकडे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या जनावरांचे मालक देखील सुस्तावलेले आहे. शहरातील रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झालेली असून नागरिकांना खड्डे चुकवत तसेच रस्त्यावरील मोकाट जनावरे चुकवत प्रवास करावा लागतो. नागरिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असून महापालिका या मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई कधी करणार ? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरात मोकाट जनावरांच्या सोबत मोकाट कुत्री देखील वाढलेली असून काही प्राणिमित्र भूतदया दाखवण्याच्या नादात मोकाट कुत्र्यांना खाऊ घालतात त्यामुळे कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे मोकाट कुत्री तर दुसरीकडे रस्त्यावर बसलेली जनावरे यांनी नागरिकांचे रस्ते अडवले असून संतप्त नगरकर आता महापालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कोंडवाडा विभाग नेमका कोणाला कोंडतो ? असा देखील संतप्त सवाल नागरिक करत असून या मोकाट जनावरांना दिवसभर बाहेर फुकट खायला मिळत असून रात्री घरी गेल्यानंतर मालकाला त्यांच्यावर विशेष काही खर्च करावा लागत नाही त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांची देखील संख्या वाढत आहे.


शेअर करा