राहुल गांधींची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन केली

शेअर करा

देशातील वाढलेली महागाई, भ्रष्टाचार आणि पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात भारत यात्रा यशस्वी झालेली असून आमचे यात्रेचे उद्दिष्ट साध्य झालेले आहे असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलेले असून यापुढील काळात देखील जनतेच्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास आम्ही केंद्र सरकारला बाध्य करणार आहोत असे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला उत्तरे दिली त्यावेळी ते म्हणाले की, ‘ भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे राहुल गांधी यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन केली जात आहे. देशातील वस्तुस्थिती जनतेपुढे ते मांडत आहेत म्हणून त्यांच्याविषयी खोटेनाटे दावे केले जात आहेत. भारत जोडो यात्रेला साठ दिवस पूर्ण झाले असून महागाई, भ्रष्टाचार आणि दरवाढ या मुद्द्याला राहुल गांधी यांनी हात घातला. आगामी काळात देखील सरकारला जनतेच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल म्हणून आम्ही दबाव वाढवणार आहोत ‘, असे म्हटले आहे.


शेअर करा