बायकोची ऑडिओ क्लिप ऐकून पतीने घेतले विष , पाच जणांवर गुन्हा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे समोर आलेली असून पत्नीवर अत्याचार झाल्यानंतर आरोपीने पाठवलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकून बदनामी होण्याच्या भीतीने पीडित महिलेच्या पतीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. 5 नोव्हेंबर रोजी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गजानन देशमुख, रवी सपकाळ, गजानन शिरसाट ( सर्वजण राहणार पिंपळगाव रेणुकाई ) अशी आरोपींची नावे असून इतर दोन महिलांचा देखील आरोपीत समावेश आहे. रवी सपकाळ याच्याशी सदर महिलेला बोलण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून त्याचे चित्रीकरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला.

सदर प्रकारानंतर देखील आरोपींनी या महिलेच्या पतीला तिच्या सोबत झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पाठवल्या आणि त्या ऐकल्यानंतर आपली बदनामी झाल्याचा समज करून पीडित महिलेच्या पतीने पाच नोव्हेंबर रोजी विषप्राशन केले होते. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपी आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे .