‘ तिच्याशिवाय जगू शकत नाही ‘ सरपंचाने घेतले जिल्हाधिकारी कार्यालयात विष

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला असून शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. विवाहित प्रेयसीसोबत राहू दिले जात नाही. आम्हा दोघांना त्रास दिला जातो मात्र आम्ही एक दोघांना एकमेकांशिवाय जगू शकत नाही, असे निवेदन देऊन एका सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयात 29 तारखेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

उपलब्ध माहितीनुसार, अविनाश चव्हाण असे या तरुणाचे नाव असून तो सध्या श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील सरपंच आहे. त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले मात्र त्यानंतर महिलेच्या पतीने तिला मारहाण केली आणि अविनाश यांच्यासोबत देखील त्याचे वाद झाले. महिलेच्या पतीने अखेर तिला माहेरी नेऊन घातले त्यावेळी या महिलेने अविनाश यांना फोन करून आपला पती आपल्याला मारहाण करतो आहे असे सांगितले त्यानंतर या दाम्पत्याने प्रेमीयुगुलाने पलायन देखील केले होते मात्र नाशिक वरून त्यांना ताब्यात घेऊन परत आणण्यात आले .

नाशिकहून परत आल्यानंतर देखील आपल्याला सोबत राहायचे आहे, आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही मात्र आम्हाला नातेवाईक आणि इतर लोक त्रास देत आहेत असे अविनाश याचे म्हणणे असून जिल्हाधिकारी कार्यालयात तो निवेदन देण्यासाठी मंगळवारी आला होता. पाचव्या मजल्यावर पोहोचल्यानंतर लिफ्टमधून बाहेर आल्यावर त्याने तात्काळ विष प्राशन केले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस हवलदार शेख यांनी त्याला पालथे पाडून पोटातील विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला रुग्णालयात दाखल केले.


शेअर करा