दामिनी पथकाला कारमध्ये ‘ आक्षेपार्ह ‘ चाळे दिसले अन..

शेअर करा

अनेक शहरांमध्ये जोडप्यांना भेटण्यासाठी असे काही खास लोकेशन असतात मात्र अशा ठिकाणी देखील आता गर्दी होत असल्याने अनेक जोडपी भेटण्यासाठी म्हणून जिथे कुणाची अडचण होणार नाही अशा ठिकाणी भेटण्यास प्राधान्य देतात मात्र अनेकदा अशा जागा उपलब्ध होत नसल्याने कारमध्ये देखील भेटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

औरंगाबाद शहरात सुधाकरनगर परिसरातील एका तलावाजवळ असेच एक जोडपे कारमध्ये आढळून आले होते. दामिनी पथकाची गाडी फिरत असताना त्यांना कारमध्ये असभ्य वर्तन लक्षात आले त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून 21 वर्षे तरुणी आणि 22 वर्षीय तरुण यांची चौकशी केली. विशेष म्हणजे पोलिसांना देखील त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना पथकाने सातारा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले आणि त्यांची चौकशी करून ताकीद देऊन त्यांना सोडून देण्यात आले.


शेअर करा